Gujarat Rain News: गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बिपरजॉय चक्रिवादळानंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या परिस्थितीमध्ये आतापर्यंत ११ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. काल दिवसभर मुसळधार पाऊस बरसल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत पोहचण्यासाठी आता एसडीआरएफची टीम सक्रिय झाली आहे. आपत्ती प्रतिसाद दलाकडून पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Latest Marathi News)
गुजरातच्या जामनगर परिसराला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या पावसामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत गुजरातमध्ये ३२ मिमी इतका पाऊस झाला आहे.
केंद्राकडून मिळणार मदत
गुजरातमध्ये सध्या असलेल्या परिस्थितीवरुन अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. गुजरातमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं ट्वीट देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पूराच्या पाण्याने ज्याची घरं उध्वस्त झाली आहेत अशा सर्व नागिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांना अन्नधान्य आणि आश्रय पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शहा म्हणाले. केंद्र आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.