mahayuti Saam tv
महाराष्ट्र

Guardian Minister Post: पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोली तर अजितदादांकडे २ जिल्ह्यांचा भार

Guardian Minister Post List: राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झालीय.

Bharat Jadhav

राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झालीय. अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद देण्यात आले आहे.तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद गेले आहे. मंत्रिपदासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी होती. आज अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून यादी जाहीर करण्यात आलीय.

काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने महायुती सरकारची डोकेदुखी वाढली होती. काही वेळापुर्वीच संभाव्य पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेच पालकमंत्र्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

पालकमंत्र्यांची यादी वाचा

१. गडचिरोली - देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री

२. ठाणे - एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप. मुख्यमंत्री

३. मुंबई शहर- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,

४. पुणे -अजित आशाताई अनंतराव पवार, उप. मुख्यमंत्री

५. बीड - अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री

६. नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

७. अमरावती- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

८.- अहिल्यानगर - राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील

९. वाशिम- हसन सकिना मियालाल मुश्रीफ

१०. सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

११. नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

१२. पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

१३. जळगांव - गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

१४. यवतमाळ - संजय प्रमिला दुलिचंद राठोड

१५. मुंबई उपनगर - अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार, मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री)

१६. रत्नागिरी- उदय स्वरुपा रविंद्र सामंत

१७. धुळे -जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

१८ जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

१९. नांदेड - अतुल लिलावती मोरेश्वर सावे

२०. चद्रपूर- डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके

२१. सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

२२. रायगड - कु. आदिती वरदा सुनिल तटकरे

२३. लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

२४. नंदूरबार- अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

२५. सोलापूर -जयकुमार कमल भगवानराव गोरे

२६. हिंगोली - नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ

२७. भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे

२८. छत्रपती संभाजीनगर - संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट

२९. धाराशिव - प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

३०. बुलढाणा - मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

३१. सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे

३२. अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

३३. गोंदिया -बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT