Beed Guardian Minister : धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपदापासून वगळलं, बीडची पॉवर आता अजित पवारांकडे

Beed Guardian Minister Post : धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणाचा मोठा फटका बसला आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रिपद हुकल्याचं बोललं जात आहे. बीडचं पालकमंत्रिपद आता अजित पवारांना देण्यात आलं आहे.
Ajit pawar Dhanajay Munde
Ajit pawar and Dhanajay MundeSaam Tv
Published On

मुंबई : महायुती सरकराची पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महायुती सरकारच्या पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळ्यात आलं आहे. अजित पवारांना बीडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवारांकडे यंदा पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीतून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

महायुती सरकारचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. आज शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली आहे. महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं नाही. त्यांना संतोष देशमुख प्रकरण भोवल्याचं बोललं जात आहे. तर बीडचं पालकमंत्रिपद पंकजा मुंडे यांनाही देण्यात आलं. त्यांना जालना जिल्ह्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा अजित पवार यांच्याकडे पुण्यासहित बीड जिल्ह्याचाही पालकमंत्रिपदाचा भार असणार आहे.

Ajit pawar Dhanajay Munde
Maharashtra Politics : छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये अबोला कायम, २ तासातच अधिवेशनातून माघारी, शिर्डीत नेमकं काय घडलं?

कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गडचिरोली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मुंबई, ठाणे

उपमुख्यमंत्री अजित पवार - पुणे , बीड

चंद्रशेखर बावनकुळे - नागपूर, अमरावती

राधाकृष्ण विखे-पाटील - अहिल्यानगर

हसन मुश्रीफ - वाशिम

चंद्रकांत पाटील - सांगली

गिरीश महाजन - नाशिक

गणेश नाईक - पालघर

गुलाबराव पाटील - जळगाव

संजय राठोड - यवतमाळ

आशिष शेलार - मुंबई उपनगर

मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर (सह-पालकमंत्री)

Ajit pawar Dhanajay Munde
Maharashtra Politics News: नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?; सांगितला तो किस्सा

उदय सामंत - रत्नागिरी

जयकुमार रावल - धुळे

पंकजा मुंडे - जालना

अतुल सावे - नांदेड

डॉ. अशोक उईके - चंद्रपूर

शंभूराज देसाई - सातारा

आदिती तटकरे - रायगड

शिवेंद्रसिंह भोसले - लातूर

अॅड माणिकराव कोकाटे - नंदूरबार

जयकुमार गोरे - सोलापूर

नरहरी झिरवाळ - हिंगोली

संजय सावकारे - भंडारा

संजय शिरसाट - छत्रपती संभाजीनगर

प्रताप सरनाईक - धाराशिव

मकरंद जाधव - बुलढाणा

नितेश राणे - सिंधुदुर्ग

आकाश फुंडकर - अकोला

बाबासाहेब पाटील - गोंदिया

माधुरी मीरा सतिश मिसाळ - कोल्हापूर (सह-पालकमंत्री)

अॅड. आशिष जयस्वाल - गडचिरोली (सह-पालकमंत्री)

पंकज भोयर - वर्धा

मेघना बोर्डीकर - परभणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com