विनोद जिरे
बीड: जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, महिलावरील अत्याचार, खून, दरोडे, यावरून भाजप खा. डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधलाय. कायदा-सुव्यवस्था राखण्यात पालकमंत्री अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केलीय. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे (Pankja Munde) पालकमंत्री असतानाचे, मागच्या पाच वर्षांचे रेकॉर्ड तपासून पहा, असा सल्ला दिला आहे. यावरून बीडच्या (Beed) कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे बंधू-भगिनी आमनेसामने आले आहेत. (Dhananjay Munde VS Pritam Munde)
बीड जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्नवरून, थेट राज्याचे गृहमंत्र, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी तक्रार केली होती. तसेच भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांची स्वतः भेट घेऊन परिस्थिती सुधारण्याचे सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील परिस्थिती परिस्थिती जैसे थे असल्यामुळे प्रीतम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोट दाखवत हे ते अपयशी होत आहेत, अशी टिका केलीय.
गुन्हे करताना गुन्हेगाराला पोलिसांची भीती वाटत नाही, माफिया राज आपल्याच छत्रछायेखाली वाढत आहेत, तिथे न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडे ? येथे कॉन्स्टेबल पासून मंत्र्यापर्यंत सर्वच भ्रष्ट आहेत. बीड जिल्ह्यात यायचं म्हटल तरी वरिष्ठ अधिकारी बीड म्हणलं की नको म्हणतात. होपलेस परिस्थिती निर्माण झाली आहे, लाज वाटते.. कायदा सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये. याची सत्ताधार्यांनी दक्षता घ्यावी. असा इशारा देखील प्रितम मुंडे यांनी दिला.
तर भाजपा खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे. मागच्या पाच वर्षाचा क्राईम रेकॉर्ड पाहिले असता, आमच्या भगिनी खासदार होत्या तर दुसऱ्या भगिनी पालकमंत्री होत्या. त्यावेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. तेव्हा त्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. एखाद्याला गुन्हा केला असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल. कायदा सर्वांना समान आहे, त्याच्यावर पोलीस प्रशासन ॲक्शन घेईल, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुंडे भगिनींना टोला लगावला आहे..
हे देखील पाहा-
दरम्यान, बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था वरून मुंडे बहिण-भाऊ आमने-सामने आले असले तरीही जिल्ह्यातील आजची परिस्थिती विचार करायला लावणारी आहे. जिल्ह्यात बलात्कारा सारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे, खून, मारामाऱ्या, दरोडे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यामुळे कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही ? असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडत आहे. त्यामुळे बहीण-भावांची टिका टिपन्नी जाऊ द्या. मात्र जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आणा. असा सूर बीडकरांमधून निघत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.