Amol Mitkari on Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Amol Mitkari on Devendra Fadnavis: 'पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अकोला जिल्ह्याकडे दुर्लक्ष', मिटकरी यांनी राज्यपालांना लिहिलं पत्र

'पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अकोला जिल्ह्याकडे दुर्लक्ष', मिटकरी यांनी राज्यपालांना लिहिलं पत्र

अॅड. जयेश गावंडे

Amol Mitkari on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती बरोबरच अकोला जिल्ह्यातील समस्यांचा पाढा वाचला.

त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ''शरद पवार यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री पदावर असताना या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ दिला आहे. राज्यात सध्या दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील जनतेला असुरक्षित वाटणे साहजिक आहे. तसेच महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.''

मेटकरी यांनी पत्रात लिहिलं आहे की, शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुद्धा आहेत. मागील तीन महिन्यात अकोल्यात अंध महिलेवर झालेला बलात्कार, पारस तालुका बाळापूर येथे चक्रीवादळात झालेला दहा लोकांचा मृत्यू, व्हाट्सअप स्टेटस वरून उसळलेली दंगल, शहरात वाढलेले गुन्ह्याचे प्रमाण, परवा चर्चगेट मुंबई येथे सावित्रीबाई फुले वस्तीगृहात अकोल्यातील तरुणीवर झालेला बलात्कार व खून, तसेच कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, याकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

ते म्हणाले आहेत की, बँकेच्या सिबिल अटीमुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी आर्थिक कोंडी, जिल्हा नियोजनाचा अपूर्ण निधी यासह खाजगी शिकवणी क्लासेस कडून केली जाणारी आर्थिक लूट, बंद पडलेला उड्डाणपूल, आरटीई अंतर्गत होणारा अनेक शाळातील गैरव्यवहार, आदी मोठे प्रश्न जिल्ह्यासमोर असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

आपण या राज्याचे पालक आहात आमच्या जिल्ह्यातील रोजगार संबंधी एकही प्रश्न मागील तीन वर्षात संसदेत मांडला गेला नसल्याची खंत आहे. ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई. शेतकऱ्यांबाबत कृषी विद्यापीठ व महामंडळ महाबीजची असणारी अनास्था या प्रश्नाच्या उत्तरा करिता महिन्यातून एक दिवस पालकमंत्र्यांनी जिल्ह्यास द्यावा याबाबत आपण स्वतः पालक मंत्र्यांना अवगत करावे व गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती आमदार अमोल मिटकरी यांनी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार

Pune : 'ड्राय डे’ला मध्यवर्ती भागात दारू विक्री; मटका किंगसह तिघांवर गुन्हा, लाखोंचा साठा जप्त

Manoj Jarange Morcha: मराठा मोर्चादरम्यान दुर्दैवी घटना, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Hair Care Tips : केस राठ झाले आहेत? नारळाचे तेल आणि कोरफडपासून बनवा घरच्या घरी हे नैसर्गिक हेअर सीरम

Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनामध्ये आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू, रेल्वेसह रस्ते वाहतूक ठप्प; भाविक अडकले

SCROLL FOR NEXT