Police investigating the suspicious death of GST officer Sachin Jadhav on Solapur-Dhule highway. Saam Tv
महाराष्ट्र

GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

GST Officer Suspicious Death Beed: बीडमध्ये राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसपूर्वी घडली होती. पत्नी मयूरी जाधव यांनी पतीला मानसिक त्रास दिल्याचा दावा करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, गेल्या आठ दिवसांपासून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. गाडीमध्ये सुसाईड नोट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही. ती आम्हाला दाखवावी. त्या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या पत्नी मयूरी जाधवर यांनी केली.

आठ दिवसांपासून माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जात होता. गाडीमध्ये सुसाईड नोट असल्याचे सांगितले जाते. मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही. ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी तसेच दोषी अधिकाऱ्याचे नाव समोर येत आहे. त्याला थेट शिक्षा व्हावी, अशी मागणी मयत सचिन जाधव यांच्या पत्नी मयुरी जाधव यांनी केली आहे.

माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत, असा ठाम दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचा धुळे - सोलापूर महामार्ग लगत पालीजवळ मृतदेह आढळला होता, माझी फिर्याद नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशीही मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात बोलताना केली.

नेमके प्रकरण काय?

सहा दिवसापूर्वी बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते दोन दिवसापासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. सचिन जाधवर यांची कार सोलापूर - धुळे महामार्गालगत आढळून आली. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. तसेच कारमध्ये कोयता आणि मडकं सापडल्याने संशय अधिक बळावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT