Grocery Price Hike in India saam tv
महाराष्ट्र

Grocery Price Hike : कांदा-साखर महागली, डाळी-तांदळाचे भावही वाढले; किराणा बाजारातील नवे दर वाचाच

Onion and Sugar Price Increase : किराणा बाजारात महागाईचा भडका उडलेला आहे. कांदा, साखर, डाळी तांदूळ आणि खाद्यतेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर स्पष्टपणे दिसायला लागला आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्यामुळे घरखर्च सांभाळणं कठीण होतंय. महत्त्वाचं म्हणजे फक्त सर्वसामान्यच नाही, तर चांगलं उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही या महागाईचा फटका बसतोय. कांदा, साखर, तांदूळ, डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे महिन्याचं बजेट कोलमडलेलं असून किराणा खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतायेत.

कांद्याच्या दरात सर्वात जास्त वाढ

गेल्या वर्षभरातल्या किराणा वस्तूंच्या किमती पाहिल्या तर कांद्याच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाल्याचं दिसतंय. नोव्हेंबर २०२५ मध्ये कांद्याचा किलोचा भाव २७ रुपये होता. तर आता तो ५४ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच कांद्याच्या किंमतीत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली.

साखरेच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४७ रुपये किलो असलेली साखर आता ६१ रुपयांवर पोहोचली. तर कोथिंबिरीची किंमत ३७ रुपयांवरून ४५ रुपये झाली. तूरडाळीचा भाव ११६ रुपयांवरून १३६ रुपये झाला.

खाद्यतेल आणि तांदळाचे दरही वाढले

खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर १६५ रुपयांवरून १९१ रुपये, तर मोहरीच्या तेलाचा दर १८७ रुपयांवरून २१२ रुपये झाला आहे. तांदळाचे दरही ४३ रुपयांवरून ४९ रुपये झाले आहेत. तसेच उडीद डाळ, लाल मिरची, अंडी, तूप आणि दुधाच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.

बटाटा आणि टोमॅटोच्या दरात दिलासा

एकीकडे बऱ्याच वस्तू महागल्या असताना बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मात्र घट झाली आहे. बटाट्याचा दर २७ रुपयांवरून २३ रुपये, तर टोमॅटोचा दर ४५ रुपयांवरून ३८ रुपये झाला आहे. तर ऑक्टोबर २०२६ मध्ये महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला. अन्नधान्य महागाईचा दर ८.९४ टक्के नोंदवण्यात आला. त्यामुळे आगामी काळात घरखर्चाचं गणित कसं सांभाळायचं, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

'माझ्याशी संबंध चांगले ठेवा...' शिंदे सेनेच्या आमदाराच्या कथित कॉल रेकॉर्डिंगने जुन्नरमध्ये खळबळ

Diabetes : डायबिटीज असतानाही १०० वर्षे जगता येतं! फक्त 'ABCD' मंत्र पाळा; काय आहे हा फॉर्म्युला?

Indian Railways : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! वंदे भारतमध्ये मिळणार खास सरप्राईज

Hot Tea Health Risks: गरम-गरम चहा प्यायल्याने होतो कॅन्सर? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT