डिजिटल महाराष्ट्राचं विदारक चित्र, विद्यार्थी अजूनही पायाभूत सुविधेपासून वंचितच... विनोद जिरे
महाराष्ट्र

डिजिटल महाराष्ट्राचं विदारक चित्र, विद्यार्थी अजूनही पायाभूत सुविधेपासून वंचितच...

गावांमध्ये माणसांसह मुक्या जनावरांना धोकादायक जलप्रवास करून शेतात ये- जा कराव लागत

विनोद जिरे

बीड : आजपर्यंत आपण माणसांचा धोकादायक प्रवास पाहिला असेल, मात्र बीड जिल्ह्यात असे गाव आहे, की त्या गावांमध्ये माणसांसह मुक्या जनावरांना देखील धोकादायक जलप्रवास करून शेतात ये- जा करावी लागत आहे. आतापर्यंत या धोकादायक जलप्रवासाने ३ विद्यार्थ्यांचा बळी घेतला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही.

एकीकडे राज्याची डिजीटल महाराष्ट्र म्हणून ओळख असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील एक विदारक परिस्थिती समोर आली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील लक्ष्मीपुर ग्रामस्थांना सवासे वस्तीवर शेतात आणि गावात जाण्यासाठी तळ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या ग्रामस्थांसह त्यांच्या मुक्या जनावरांना देखील हा जीवघेणा प्रवास पोहत पार करावा लागत आहे.

हे देखील पहा-

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवासा सुरू आहे. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर दोरीच्या साहाय्याने थर्माकोलच्या चप्पूवरून हा प्रवास केला जात आहे. प्रवासादरम्यान चप्पू किंवा रस्सीने धोका दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2009 साली त्र्यंबक सवासे या शेतकऱ्याची ३ शाळकरी मुले याच तलावात बुडून मृत्यू पावले होते.

तब्बल 12 वर्षांपासूनची रस्त्याच्या मागणीची प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आलेली नाही हे विशेष म्हणावे लागणार आहे. प्रशासनाकडून रस्ता बनवून द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. याविषयी महिला ग्रामस्थ म्हणाल्या की, आमचं शेत तळ्याच्या पलीकडे आहे. यामुळे मागील २५ ते ३० वर्षापासून आम्हाला असाच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्यातून जाताना कधीकधी दुर्घटना देखील घडत असतात.

गेल्या काही वर्षांपूर्वी ३ मुलं बुडून मृत्यू देखील झाला आहे. मात्र, तरी देखील जीव मुठीत धरुन चप्पूवर बसून हा प्रवास करावा लागत आहे. नाही गेलं तर शेती कशी करावी? असा आमच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला येण्या-जाण्यासाठी सोय करून द्यावी, अशी मागणी आहे. आम्हाला आई- पप्पांसोबत रोज इथून, जीवघेणा प्रवास करून जावे लागतं आहे. खूप भीती वाटते, जीव मुठीत धरून जावं लागतं, पण गेल्याशिवाय पर्याय नाही. शेती तिकडं आहे. त्यामुळे इथून जावं लागतं. माझ्यासमोर काहीजण पडले होते. मात्र, त्याठिकाणी माणसं असल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT