सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती
सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीतीSaam Tv

सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती

यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे.
Published on

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. मात्र, तीन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. मध्यंतरी कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करतांना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीन पिकाला सप्टेंबर मधील पावासाने झोडपून काढले होते. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणवा याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला आहे.

सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती
शिरूर-हवेली च्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी, जिल्ह्यात उडाली एकच खळबळ'

आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय कापूस वेचता येणार नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीकरिता नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे भाव पडण्याची भीती वाटत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com