Bhandara News  Saam TV
महाराष्ट्र

गजब! अख्ख्या गावाची जन्म, मृत्यू अन् लग्नाची तारीख सांगणारे आजोबा

साकोली तालुक्यातील बोरगांव येथील विश्वनाथ वंजारी. त्यांचे वय 81 वर्ष. शिक्षण ही जेमतेम 4 था वर्ग झाले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: अजब! काय सांगताय भंडाऱ्यात आहे 81 वर्षाचे चालते फिरते निबंधक कार्यालय. ऐकून आश्यर्च वाटले असेल ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कार्यालय कसे चालेल फिरेल? नाही नाही आम्ही स्थावर कार्यालयाची गोष्ठ नाही तर एक जीवंत निबंधक कार्यालयाबाबत बोलतोय! होय; भंड़ाऱ्यांत एक 81 वर्षीय आजोबा आहेत ज्याना गावातील सर्वांच्या जन्म तारीख आणि मृत्युच्या तारखेचा डेटा उपलब्ध आहे. त्यांच्या कड़े गावातील कोणी आले व आपले नाव सांगितले तर ते सरळ त्याची जन्म तारीख व त्याच्या नातेवाईकांची मृत्यू तारीख सांगतात!

साकोली तालुक्यातील बोरगांव येथील विश्वनाथ वंजारी. त्यांचे वय 81 वर्ष. शिक्षण ही जेमतेम 4 था वर्ग झाले आहे. पेशाने शिंपी असलेल्या वंजारी यांची बुद्धी मात्र तल्लख. त्यांना बोरगावात चालते फिरते निबंधक कार्यालय म्हणून ओळखले जाते. कारण ही तसेच आहे. एखाद्या निबंधक कार्यालया प्रमाणे त्यांच्याकडे बोरगावातील 800 लोकसंख्येच्या जन्म तारखेचा, मृत्यु तारखेचा, इतकेच काय चक्क लग्न तारखेचा डेटा उपलब्ध आहे. तोही तोंड पाठ! मग क़ाय गावातील लोकांची झुंबड त्यांच्या घरी माहिती घेण्या करिता लागली असते. "बुआ माई जन्म तारीख सांग गा" असा आवाज त्यांच्या घरी नेहकी दूमकत असतो.

गावातील एखाद्या व्यक्तीला जन्म तारीख आठवत नसली; आई वडिलांची मृत्यू तारीख आठवन नसली का असे लोक वंजारी यांना शोधत सूटतात. आता त्यांची ख्याती इतकी झाली आहे की, बोरगांव वासी त्यांच्या महत्वपूर्ण कागदपत्र ग्रामपंचायती कडून घेण्यापूर्वी त्यांच्या तारखा विश्वनाथ वंजारी कडूंन जाणून घेतात. विश्वनाथ वंजारी यांना लहानपणापासून हा सपूर्ण "डेटा" स्मरणात ठेवण्याची सवय लागली. आता 81 वर्षात ही त्यांची स्मरण शक्ती तल्लख आहे. गावातील एकमेव शिंपी असल्याने त्यांना गावातील लोकांची सर्व माहिती सहज मिळू लागली. वंजारी यांनी ही माहिती एका डेटा रुपात जपून ठेवली आहे. त्याच्या फायदा आता लोकांना होउ लागला आहे.

विश्वनाथ वंजारी ह्यांच्या तल्लख बुद्दिचा व त्यांच्याकड़े उपलब्ध डेटाचा फायदा बोरगाववासी घेत आहे. गावातील एक व्यक्तिला त्याच्या मुलींच्यां शाळेच्या आवश्यक कामाकरीता जन्म तारखेची गरज होती. खेड़ेगाव असल्याने त्यांच्याकडे तशी नोंद मिळत नव्हती. अखेर त्यांनी वंजारी यांच्याशी संपर्क साधला व त्याच्या मुलीची तारीख त्यांच्या कडून मिळाली. आता त्यांनी ग्रामपंचायतीमधून आपला मुलीच्या दाखला मिळविला आहे. अश्या अनेक लोकांनी विश्वनाथ यांच्या स्मरणातील डेटा च्यां फायदा मिळविला आहे. आज ही एका छोट्या खेड़यात वंजारी सारखे प्रतिभावान वयोवृद्ध असतात. ज्यांच्यां अनुभव, स्मरण शक्तिची गरज गावासाठी निश्चीत होते. हे विश्वनाथ वंजारी यांच्या उदाहरणाने परत एकदा स्पष्ट झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

SCROLL FOR NEXT