harshwardhan Patil Saamtv
महाराष्ट्र

Indapur Politics: हर्षवर्धन पाटलांनी गड राखला; बावडा ग्रामपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

Indapur Grampanchayat Election Result: इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

मंगेश कचरे

Grampanchayat Election Result 2023:

राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे धुमशान सुरू आहे. एकूण 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या असून निकालही समोर येत आहेत. या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलायं. निवडणुकीत राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

इंदापूर तालुक्यातील (Indapur) बावडा ग्रामपंचायतीवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता आणली आहे. बावडा हे हर्षवर्धन पाटील यांचे गाव असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात कंबर कसली होती. मात्र अजित पवार गटाला 17 पैकी केवळ पाच सदस्य निवडून यश आले आहे.

अंतिम निकालानुसार 17 पैकी 12 जागी भाजप पुरस्कृत पॅनलचे सदस्य निवडून आले आहेत. यासोबतच सरपंच पदाच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे या चौदाशे 32 मताधिक्याने सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांनी आपल्या गावात वर्चस्व कायम राखले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत चे निकाल जाहीर झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. तर एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीकडे गेली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अजित पवार गटानेही जोरदार मुसंडी मारली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Baba Vanga: पुढचं वर्ष बदलणार आर्थिक गणितं? बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार ४ राशी ठरणार श्रीमंत

Dwi Dwadash Yog 2025: १७ वर्षांनी या राशींची होणार चांदीच चांदी; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कुठून पण कसाही करा प्रवास, नव्या वर्षांत सुरू होणार २ नवीन मेट्रो मार्ग

SCROLL FOR NEXT