महाराष्ट्र

GramPanchayat Election 2023: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; जाणून घ्या मतदानाची अन् निकालाची तारीख

Grampanchayat Election News: राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांविषयी मोठी घोषणा केलीय.

Bharat Jadhav

Maharashtra Grampanchayat Election 2023:

देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार त्याआधी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीची निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दिवशी आणि २ हजार ९५० सदस्यपदाची आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबईत केली.

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झालीय. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

तर मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. दरम्यान गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ वेगळी ठेवण्यात आलीय. येथे साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली.

राज्यातील पक्षांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची असणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे थेट समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT