grader machine collapse On Samriddhi Mahamarg thane shahapur 14 people have died so far many injured  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर सर्वात मोठी दुर्घटना, सोन्यासारखी १४ माणसं जागेवर गेली; अनेक जखमी

Grader Machine Collapse on Samriddhi Mahamarg: महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही

Grader Machine Collapse on Samriddhi Mahamarg: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या जखमा ताज्या असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भयानक दुर्घटना घडली आहे. (Latest News In Marathi)

महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे.

या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा कामगार जखमी असल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून आता या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले. गेल्या महिनाभरात समृद्धी महामार्गावरील अपघाताची ही दुसरी मोठी घटना असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

Vastu Tips: घरातील या चुका गरिबीचं मोठं कारण ठरू शकतात, देवी लक्ष्मी होईल नाराज

Pune Accident : कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT