कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारने सोडले वाऱ्यावर!
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारने सोडले वाऱ्यावर! SaamTvNews
महाराष्ट्र

कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारने सोडले वाऱ्यावर!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद : कोरोना काळात मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसदारांना 30 दिवसात 50 हजारांचे अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही हे अनुदान मृतांच्या कुटुंबीयांना मिळाले नाही.

हे देखील पहा :

या संदर्भात नाशिक येथील शिक्षणतज्ज्ञ तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. कोरोना काळात 1 लाख चाळीस हजार मृत्यू झाले आहेत. यात 75 हजार पेक्षा अधिक महिला ह्या विधवा झाल्या असून साधारण 20 हजार महिला या तरुण विधवा आहेत. मात्र त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शासन पुढे येत नाही.

त्यामुळे महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीचे स्थापन करण्यात आली आहे. या निराधार महिलांना रोजगार मिळवून देणं, मदत करणं हा उद्देश असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले आहे. बिहार किंवा इतर राज्यात या विधवा महिलांना त्या त्या सरकार कडून मदत मिळाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधवा महिलांना अद्यापही मदत मिळाली नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

Aditya Thackrey Full Speech Chiplun : भाजपला 200 पार करणे मुश्कील! आदित्य ठाकरेंचा मोठा दावा..

Ambernath : किराणा दुकानात क्राइम ब्रँचचा छापा, नेवाळी गावात मोठं घबाड सापडलं; पोलिसही चक्रावून गेले!

Murder in Mahim Trailer : सीरियल किलरच्या शोधात विजय राज आणि आशुतोष राणा, 'मर्डर इन माहीम' सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

Today's Marathi News Live : महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडीचीच येणार: जयंत पाटील

SCROLL FOR NEXT