Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

कोणी हिंदू खतरे मे है,तर कोणी मुस्लिम खतरे मे है म्हणत आहे. पण शेतकरी और मजदूर खतरे में है असं मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

Bachchu Kadu News | कोणी हिंदू खतरे मे है,तर कोणी मुस्लिम खतरे मे है म्हणत आहे. पण शेतकरी और मजदूर खतरे में है असं मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीये इतके तुम्ही पांडू आहात, अशी देखील टीका बच्चू कडूंनी केली आहे. ते कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारा निमित्ताने सांगलीच्या शिराळा इथे आयोजित सभेत बोलत होते. महायुतीमध्ये बच्चू कडू हे घटक पक्ष म्हणून सामील आहेत. मात्र तरी देखील बच्चू कडूंनी थेट हातकणंगले मतदारसंघात येऊन महायुतीच्या उमेदवाराविरोधात लढणाऱ्या राजू शेट्टींना जाहीर पाठिंबा देत, त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com