Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Press conference: आम्ही लढत राहू, सरकारकडे 24 डिसेंबरपर्यतचा वेळ; सरकारी शिष्टमंडळाला जरांगे यांनी ठणकावून सांगितलं

Manoj Jarange Press conference in marathi: आम्ही लढत राहू, सरकारकडे 24 डिसेंबरपर्यतचा वेळ, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज पुन्हा ठणकावून सांगितलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Manoj Jarange Press conference in marathi:

आम्ही लढत राहू, सरकारकडे 24 डिसेंबरपर्यतचा वेळ, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज पुन्हा ठणकावून सांगितलं आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे होते. यावेळी जरांगे पाटील असं म्हणाले आहेत.

मराठा समाजाने नेहमीच सरकारच्या शब्दांचा सन्मान केला आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही याआधीही वेळ दिला होता. पहिल्यांदा 40 दिवस वेळ दिला. आताही दोन महिने दिले 24 डिसेंबरपर्यत. समाज म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शब्द पाळण्यास आम्ही कधी कमी पडलो नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील म्हणाले, ''ज्या ज्या वेळेस सरकारणे सांगितलं मराठा समाजाने त्यांचा सन्मान केला. त्यांनीच ठरवलेले शब्द त्यांनी घ्यावे.'' ते म्हणाले, चर्चा ही 24 डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा.  (Latest Marathi News)

जरांगे म्हणाले, त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. आम्ही कायदा तोडा म्हणत नाही. नोदी कायद्याच्या चौकातीट सापडल्या. कुणबी नोदी असताना त्या ठिकाणी अधिकारी निरंक अहवाल देत आहे. या बाबद ही निर्णय घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी माहिती त्यांनी केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, अधिकारी जात म्हणून काम करताय. त्यांच्या नोटीसमुळे गैरसमज निर्माण होत आहे. त्याबाबद ही सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या नोटीस जरी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT