PM Kisan Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार ₹६०००; काय आहे योजना? वाचा सविस्तर

PM Kisan and Namo Shetkari Installment Update: केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना. या योजनेचा हप्ता एकत्र येणार आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये

पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र येणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांना मदत मिळणार आहे. त्यांना आधार मिळावा यासाठी खरीप हंगामात विमा उतरवला आहे. या विम्यासाठी शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची हिस्सादेखील भरला आहे. आता शेतकऱ्यांना लवकरच विम्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, याचसोबत शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये

फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना २००० रुपये दिला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचाही हप्ता दिला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि नववा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये मिळणार आहेत.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम कराच (PM kisan Yojana eKYC)

पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक काम करायचे आहे. शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. याचसोबत फार्मर आयडी असणेदेखील गरजेचे आहे. जर फार्मर आयडी नसेल तर योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

शेतकऱ्यांना विम्याची प्रतिक्षा

रब्बी हंगाम संपत आला तरी अजून खरीप हंगामातील विम्याची रक्कम दिलेली नाही. सोलापूरातील बार्शी तालुक्यातील ८७ हजार १३४ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. सोलापूरातील शेतकऱ्यांना १५२ कोटी विम्यातून मिळणार आहे. दरम्यान, आता याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-Israel War: इराण-इस्रायलच्या युद्धाचा भारताला मोठा फटका; फक्त २५ दिवस पुरेल इतकाच देशात तेलसाठा

अपघाताचा थरार! भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, धुळवडीच्या दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Maharashtra Live News Update : पोर्तुगाल महिलेची छेडछाड; दोन्ही आरोपी अटकेत

Pineapple Curry Recipe : घरीच ५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंट स्टाइल 'अननस करी', चवीला १ नंबर

महायुद्ध भडकलं! तेल उद्योगावर ड्रोन हल्ला; थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT