Government lawyer Vinayak Chandel : 
महाराष्ट्र

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Government lawyer Vinayak Chandel suicide in Beed cour : बीडमधील वडवणी स्थानिक न्यायालयात सरकारी वकील विनायक चंडेल यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.

Namdeo Kumbhar

  • बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाने आत्महत्या केली

  • विनायक चंडेल असे आत्महत्या करणाऱ्या वकिलाचे नाव आहे

  • सकाळी ११ वाजता घटनेचा उलगडा झाला

  • आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Government lawyer Vinayak Chandel : बीडमधील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खिडकीला दोरी बांधून सरकारी वकिलाने आयुष्याचा दोर कापला. त्यामुळे परिसरात खळबळ एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्या करणाऱ्या वकिलाचे नाव विनायक चंडेल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी विनायक यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचा शोध सुरू केला आहे. विनायक यांनी काही शेवटची चिठ्ठी ठेवली आहे का? याचा शोधही पोलिसांकडून घेतोय.

बीडच्या वडवणी स्थानिक न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी वकील विनायक चंडेल यांनी न्यायालय परिसरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले असून तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

वकिलाने कोर्टातच केलेल्या या आत्महत्येमुळे न्यायालयीन वर्तुळात तसेच वकिलांच्या समुदायात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी वकिलाने अशा प्रकारे न्यायालय परिसरातच जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मुंबई High Court बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरात एकच खळबळ

Banjara Samaj : जालन्यात आदिवासी समाजाचा मोर्चा; बंजारा समाजाला आरक्षण नाकारण्याची मागणी | VIDEO

Sarvapitri Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला करा 'ही' खास कामे, घरच्या संपत्तीत होईल वाढ

Astro Tips: महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा हे सोपे ५ उपाय

Maharashtra Politics: खानदेशात शरद पवारांना मोठा धक्का, जवळची व्यक्ती सोडणार साथ

SCROLL FOR NEXT