Yashashri Munde files nomination in Parli for Vaidyanath Bank elections, marking her entry into politics. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Yashashri Munde : गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, बँक निवडणुकीसाठी भरला अर्ज

YASHASHRI MUNDE ENTERS POLITICS : गोपीनाथ मुंडेंच्या कन्या यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज भरत राजकारणात प्रवेश केला. पंकजा आणि प्रीतम यांच्यानंतर मुंडे घराण्यातील आणखी एक सदस्य राजकारणात.

Namdeo Kumbhar

Yashashri Munde News Update: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी मुंडे या राजकीय मैदानात उतरल्या आहेत. बीडमधील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीच्या यशस्वी मुंडे यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यशस्वी यांच्यासोबत माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यशश्री यांच्या उमेदवारीमुळे मुंडे घराण्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशस्वी मुंडे या देखील राजकारणात उतरल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या यशश्रींसह माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि एकूण ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक १७ जागांसाठी होत आहे. १० ऑगस्टला मतदान आणि १२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १४ जुलैला होईल, तर १५ ते १९ जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. (When is voting for Vaidyanath Cooperative Bank election in Parli?)

Who is Yashashri Munde, daughter of Gopinath Munde?

यशश्री मुंडे यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात जगभरातील फक्त ११ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यशश्री यांना 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरवण्यात आले होते. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेय. यापूर्वी त्या राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. मात्र, आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकीय मैदानात उतरल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

SCROLL FOR NEXT