gopichand padalkar 
महाराष्ट्र

नाकाबंदी करताय? इथं, शेतकरी येणार आहेत तालीबानी नव्हे : पडळकर

विजय पाटील

सांगली : गोवंशाची शान आणि शेतकऱ्याची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हाेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ncp बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. येथे शेतकरी येणार आहेत अफगाणिस्तानहुन कोणी तालिबानी येणार नाहीत अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पडळकर gopichand padalkar हे सांगली येथील झरे येथे माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या माध्यमातून आयाेजिलेल्या बैलगाडी छकडा शर्यतीस bullock cart race प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

येत्या २० ऑगस्टला पडळकर यांनी आटपाटी येथे बैलगाडी छकडा शर्यतीचे आयाेजन केले आहे. त्याअनुषंगाने पाेलिस विभाग शर्यतीच्या ठिकाणी तसेच अन्य परिसरात नाकाबंदी लावण्याच्या तयारीत आहेत. याबाबत आमदार पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले गोवंशाची शान आणि शेतकऱ्याची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. शर्यतींबाबत गेल्या दोन वर्षात सरकारने ना तारीख काढली, ना अद्यादेश काढला. जेव्हा मी शर्यत घ्यायचं ठरवले त्यावेळी राष्ट्रवादीने शेतक-यांसमवेत बैठक घेऊन शर्यतीला विरोध नाही असे सांगण्यास सुरु केले आहे.

राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. आज (मंगळवार) पासूनच सर्वत्र नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहुन तालिबानी नाही असेही आमदार पडळकरांनी नमूद केले. तुमची दुटप्पी भूमिका शेतकऱ्यांना कळत आहे.. जर बैलगाडी आणि शेतकऱ्यावर प्रेम असेल तर राजकारण करू नका असे आमदार पडळकरांनी राष्ट्रवादीला सुनावले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: गंगापूर धरण ७३ टक्के भरलं, धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT