Samruddhi Mahamarg Free Tyre Check Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील अपघातांचं प्रमाण कमी होणार? परिवहन विभागाकडून नव्या उपक्रमाला सुरूवात

Samruddhi Mahamarg Tyre Check: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर आता टायर पॉईंची सुरूवात करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Mahamarg Free Tyre Check: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर आता टायर पॉईंची सुरूवात करण्यात आली आहे. या टायर पॉईंटवर वाहनांच्या टायरमधील हवेचा दाब मोफत तपासून दिला जाईल. त्याचबरोबर टायरची गुणवत्ता कशी आहे हे सुद्धा तपासलं जाईल. याशिवाय वाहनाचा टायर अत्यंत कमकुवत असला, तर वाजवी दरात टायर बदलण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नागपूरमधून समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना टोल प्लाझा जवळ हा टायर पॉईंट देण्यात आला आहे. नागपूर (Nagpur) ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांचे हस्ते या टायर पॉईंटचे उदघाट्न करण्यात आले.

या उपक्रमात वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर , चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहे. यापूर्वी महामार्गावरील शिर्डीजवळ टायर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण झाले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून अपघात वाढले आहेत. यातील बरेच अपघात वाहनांचा टायर फुटल्याने घडत असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग, महामार्ग पोलिस (Police) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खराब टायर असलेल्या वाहनचालकांना ‘समृद्धी’वर प्रवेश मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) वाहनांची तपासणी देखील करण्यात आली होती. मात्र, आता समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी टायर पॉईंची सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीपाठोपाठ आता नागपूरमध्येही टायर तपासणी केंद्र उभारण्यात आल्याने आतातरी समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होईल का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

Public Toilet Risk: शौचालयातील हँड ड्रायरमुळे आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Jalgaon Corporation Election : जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा करिश्मा करणार? महाविकास आघाडीचा लागणार कस

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

Nanded Heavy Rain : नांदेड शहराला पावसाचा फटका; नांदेड ते मुदखेड महामार्गावरील वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT