Vande Bharat Express saam tv
महाराष्ट्र

Vande Bharat Express: कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, या मार्गावर लवकरच 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार

Latest News: कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली

Priya More

Ratnagiri News: कोकणामध्ये (Konkan) जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच त्यांचा कोकणातील प्रवास सुखकारक आणि वेगवान होणार आहे. कोकणवासीयांची वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. आज या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते मनमाड (Mumbai To Manmad) या दरम्यान ही ट्रायल रन घेण्यात आली.

मुंबईवरुन चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. आज पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. या ट्रायल रनसाठी मुंबईच्या सीएसएमटी जंक्शन इथून सकाळी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. ही एक्स्प्रेस दुपारी अडीच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ही ट्रायल रन यशस्वी झाली आहे. या मार्गावरुन 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावली.

कोकण रेल्वे मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोकणवासीयांना या रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस अनेक ठिकाणी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सध्या राज्यात तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. लवकरच राज्यात चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर मुंबई- शिर्डी अशी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. आता चौथी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच कोकण मार्गावर धावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

SCROLL FOR NEXT