Solapur Airport google
महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Solapur Airline: सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे.

Dhanshri Shintre

Solapur City: सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात 'उड्डाण' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर - मुंबई आणि सोलापूर - गोवा विमानसेवा सुरु होण्यातला मोठा अडथळा दूर झाला आहे. सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.

मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक-

सोलापूर - मुंबई

सकाळी 9:40 वाजता विमान उडणार (सकाळी 10:40 मुंबईत आगमन)

मुंबई - सोलापूर

दुपारी 12:45 वाजता विमान उडणार (दुपारी 1:45 सोलापुरात आगमन)

गोवासाठी उड्डाण वेळापत्रक-

सोलापूर - गोवा

दुपारी 2:15 वाजता विमान उडणार (दुपारी 3:15 गोव्यात आगमन)

गोवा - सोलापूर

सकाळी 8:10 वाजता विमान उडणार (सकाळी 9:10 सोलापुरात आगमन)

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात पैसा येणार

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT