Good News For Farmers Ganpati Bappa will arrive with Maharashtra heavy rain alert Mumbai Pune Weather Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: गणपती बाप्पाचं आगमन पावसाने होणार; आजपासून 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

Satish Daud

Maharashtra Weather Alert Today News

पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा गणपती बाप्पाचं आगमन पावसाने होणार आहे. आजपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने याबाबतची अपडेट दिली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांवर आलेलं पाणी संकट दूर होऊ शकतं. (Latest Marathi News)

पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगांची जमावट होत आहे. परिणामी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आज राज्यातील ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे. दरम्यान, मंगळवारी गणरायाचे आगमनदेखील पावसातच होणार आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. अशातच हवामान खात्याने मंगळवारपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT