America Weather Agencies Rain Prediction Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : आनंदाची बातमी! अल निनोचा प्रभाव संपला, 'या' दोन महिन्यांत मुसळधार पाऊस कोसळणार, वाचा US IMD अंदाज

America Weather Agencies Rain Prediction : महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचे सावट आणणारा अल निनोचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज यूएस हवामान संस्थांनी वर्तवला आहे.

Satish Daud

मान्सून दाखल होऊनही सध्या राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशातच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचे सावट आणणारा अल निनोचा प्रभाव संपला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज यूएस हवामान संस्थांनी वर्तवला आहे.

इतकंच नाही, तर यंदाचा पाऊस गेल्यावर्षीच्या पावसाची कमतरता भरून काढू शकतो, असंही अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अल निनोचा भारतीय हवामानावर नकारात्मक प्रभाव पडतो. तर ला निना भारतातील मान्सूनसाठी अनुकूल आहे. अगदी वर्षभरापूर्वी पॅसिफिक महासागरातील पेरूजवळील समुद्राच्या पृष्ठभागाजवळ अल निनो तयार झाला होता.

जवळजवळ ११ महिने अल निनोने जागतिक हवामानावर वर्चस्व गाजवलं. यामुळे देशातील वातावरणात मोठे बदल झाले. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. याशिवाय पाण्याची परिस्थिती देखील गंभीर बनली. अखेरीस अल निनोचे राज्य संपले आहे.

अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरात सुमारे दोन महिन्यानंतर ला नीना तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात मोठे बदल होऊन पावसाला पोषक असे वातावरण तयार होईल. परिणामी हंगामाच्या उत्तरार्धात भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल.

अमेरिकेच्या हवामान खात्याने काय सांगितले?

  • जवळपास ११ महिन्यांच्या कालावधीनंतर अल निनोचा प्रभाव संपला आहे.

  • जुलै-सप्टेंबरमध्ये ला नीना विकसित होण्याची 65% शक्यता आहे.

  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल.

  • ला निनाची अशी स्थिती दर ३ ते ७ वर्षांनी तयार होते. ज्यामुळे अनेक भागात चांगला पाऊस होतो.

  • ला निनामुळे महासागरातील पृष्ठभागावरील पाणी सामान्य पातळीच्या खाली थंड होते.

  • वाऱ्यांच्या बदलांमुळे जगातील हवामानात मोठे बदल होतात. परिणामी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT