Satara, Youth, Police, Powai Naka SaamTv
महाराष्ट्र

Gondia crime : संतापजनक! महिलेची दगडाने ठेचून हत्या...; धक्कादायक घटनेनं गोंदिया हादरलं

लखन मंगरू लिल्हारे (वय 39) असे आरोपीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत घोरमारे

Crime News : गोंदिया जिल्ह्यातून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. एका महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अज्ञात ठिकाणी महिलेचे शव आढळून आल्यावर या घटनेचा तपास करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या पानगावात ही घटना घडली आहे. आरोपीने महिलेला आधी मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला दगडाने देखील ठेचले यात महिलेचा मृत्यू झाला.दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन खूनाचा उलगडा करून अवघ्या काही तासांत गुन्हेगारास अटक करण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया पोलिसांनी यश आले आहे. पोलिसांनी एका आरोपिला अटक केली आहे. लखन मंगरू लिल्हारे (वय 39) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पानगाव ते सालेकसाकडे येणाऱ्या पानगाव तलावाच्या काठावर एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळूला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सोबत तपास सुरु केला असता मिळालेल्या गुप्त माहितीवर खून करणारा आरोपी लखनलाल मंगरू लिल्हारे (39, रा. परसवाडा, लांजी, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. त्याची सखोल विचारपूस व चौकशी करण्यात आली असता आरोपीनेच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपिच्या कुटुंबियांना देखील ताब्यात घेतलं आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजले नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT