Hyderabad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : धक्कादायक! वन परिसरात आढळला झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या मृत्यूच कारण अद्याप अस्पष्ट

तरुणाच्या गळ्यावर जखमा दिसत असल्याने त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gondia News: गोंदिया शहराच्या रामनगर पोलीस ठाणे परिसरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेतील एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळून आला आहे. तरुणाच्या गळ्यावर जखमा दिसत असल्याने त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी खुनाची नोंद केली आहे. संदीप भाऊलाल चिखलोंडे (29), रा. चांदणीटोला (नागरी), ता. जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालय हिवराजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेत संदीप चिखलोंडे याचा मृतदेह झाडाला लटकलेला स्थितित होता. सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यावर तरुणाने आत्महत्या केली असे काहींना वाटले. उमेश ओमकार माहुले, रा. हिवरा याने पोलिस पाटील विनोद नंदेश्वर यांना सदर घटनेची माहिती दिली.

नंदेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता वन विभागाच्या मोकळ्या जागेत एका झाडाला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संदीप चिखलोंडे याच्या मानेवर धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करण्यात आला.

त्यानंतर त्याच्या गळ्याला गमछा, मफलरसारख्या कपड्याने बांधून झाडाला लटकवले. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागोजागी रक्ताचा सडा पडला होता. संदीपचा खून करणारे ओळखीचेच असावेत असा कयास लावला जात आहे. यासाठी रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस एकत्र येत आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. आरोपी सापडल्यानंतरच या खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT