gondia, police, arrests, naxals Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Police News : नागनडोह जंगलात स्फोटकांच्या बॅगसह नक्षलवाद्याला अटक

नक्षल्यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने धडक कारवाई केली.

अभिजीत घोरमारे

Gondia News : नक्षलवाद्यांकरीता स्फोटके घेवुन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला गोंदिया पोलिसांच्या नक्षली सेलने अटक केली आहे. गोंदिया (gondia latest news) जिल्ह्याच्या पोलिस स्टेशन केशारी अंतर्गत नागनडोह जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गोंदिया जिल्हा पोलीस (gondia police) पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की पोलिस स्टेशन केशोरी अंतर्गत भरनोली लगतच्या नागनडोह जंगल परिसरात घनदाट जंगलात एक इसम हा पोलिसाविरुध्द घातपाती विध्वंसक कारवाई करण्याचे दृष्टीने माओवादी- नक्षलवादी यांना स्फोटके व इतर साहित्य देण्याकरिता जंगल मार्गाने जाणार आहे.

नक्षल्यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने स्फोटके घेवुन जाणार असलेल्या व्यक्तीला जेरबंद करण्याचे दृष्टीने नागनडोह जंगल परिसरात सापळा रचून घनदाट जंगल परिसरात संशयीतरित्या पाठीवर काळया रंगाची बॅग घेवून जात असताना एका इसमास ताब्यात घेतले.

ताब्यांत घेतलेल्या इसमाचे पाठी वरील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 1 डेटोनेटर, 1 जिलेटीनची कांडी असे स्फोटके साहित्य मिळुन आले. या प्रकरणी किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (वय 31, रा. खारकाडी, पोस्ट- हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपी हा टीपागड दलमचा सक्रीय सदस्य आहे. ताे सन 2009 मध्ये गडचिरोली पोलीसांविरुद्ध नक्षलवाद्यांनी मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचे तसेच सन 2011 मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ला, इत्यादी घातपाती हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT