Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia : तीन मित्रांचा करुण अंत; शेत तळ्यामध्ये पोहायला गेले असता बुडून मृत्यू

Gondia News : पोहायला तळ्यात उतरल्यानंतर तिन्ही तरुण पोहत तळ्याच्या मधोमध गेले. यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: रविवारचा दिवस असल्याने तिघे मित्र गावापासून जवळच असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. शेततळ्यात उतरल्यानंतर तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. यात तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे घडली आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामधील पुराडा गावच्या शेतशिवारात सदरची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अभिषेक आचले (वय २०), आदित्य बैस (वय १६) व तुषार राऊत (वय १८) अशी तीनही मृत झालेल्या तरुणांची नावे असून तिघेही देवरी तालुक्यातील पुराडा येथील रहिवासी आहेत. गावातील तीन तरुणांच्या मृत्यूच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले 

दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास हे तिघेही तरुण पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेले होते. तळ्यात उतरल्यानंतर या तिन्ही तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. यानंतर शवविच्छेदनासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली आहे.

रावेत येथील नदी पात्रात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील नदीपात्रात आज सकाळी एक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. रावेत येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज या नदीवरील पुलाखाली अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी रावेत पोलीस तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविली आहे. आता अग्निशमन दल आणि रावेत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT