जळगाव : चांगले शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही. तसेच बाहेर काही काम मिळत नसल्याने बेरोजगार असलेल्या तरुणाने कंटाळून टोकाचे पाऊस उचलले आहे. बेरोजगारीला कंटाळून या तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले होते. यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथील जळगाव शहरात समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील राधाकृष्णनगरामधील सुरेंद्र रामसिंग चौधरी (वय ३३) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव असून, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सुरेंद्र चौधरी हा आईसोबत राधाकृष्णनगरात राहत होता. सुरेंद्र हा मागील काही नोकरी व कामाच्या शोधात होता. मात्र काम नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सुरेंद्रची आई बाहेर गेली होती. त्या वेळी घरी एकट्याच असलेल्या सुरेंद्रने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले.
आरडाओरड करत पळत सुटला
अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने वेदनेने पेटत्या अवस्थेत तो आरडाओरड करीत घराबाहेर रस्त्यावर पळत सुटला. हे दृश्य पाहून कॉलनीतील तरुणांनी आग विझवून तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असताना गंभीर भाजल्याने त्याचा अखेर मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने आईने एकच आक्रोश केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
आईला भेटण्यासाठी आला आणि संपविले जीवन
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील गणपतीनगरात राहणाऱ्या कृष्णा राहुल सोनवणे (वय १६) या अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कृष्णा याचे आई- वडील विभक्त झाले असून, वडील मुंबईला तर आई पिंप्राळा हुडको परिसरात राहते. कृष्णा व त्याचा मोठा भाऊ हे मुंबई येथे वडिलांकडेच राहतात. दोन दिवसांपूर्वीच आईला भेटण्यासाठी आला होता. कृष्णाने रात्री गळफास घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.