Gondia News Heavy Rain
Gondia News Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: सततच्‍या पावसाने जनजीवन विस्‍कळीत; घरात शिरले पाणी, रात्र काढली जागून

अभिजीत घोरमारे

गोंदिया : सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी झाले आहे. नद्यांना देखील पुर आहे. याच सततच्‍या पावसामुळे (Heavy Rain) नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. शिवाय, बांधतलावाचे पाणी सुर्याटोला परीसरातील रस्त्यावर आले आहे. (Gindia News Heavy Rain)

गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मूसळधार पावसामुळे (Rain) शहरातील बांध तलाव ओव्हर फ्लो झाले आहे. या बांधतलावाचे पाणी सुर्याटोला परीसरातील नागरीकांच्या घरात शिरले असून पाण्यामुळे अनेक नागरीकांना रात्र जागून काढावी लागली. तर मोठ्या प्रमाणात बांधतलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने या पाण्यातून वाहन काढायचे कसे? असा प्रश्न वाहन चालकांना पडला.

धानपिकांचे नुकसान

सततच्‍या पावसामुळे जिल्ह्यातील धानपिकही पाण्याखाली गेल्याने ते सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नदीनाले उसंडून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र जिल्हा प्रशासन सुस्तच असल्याचे चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

SCROLL FOR NEXT