Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : भाजप आमदाराने अधिकाऱ्यांना बसविले रस्त्यावर; स्वतःही मांडला ठिय्या, काय आहे नेमके कारण?

Gondia News : गोरेगाव तालुक्यातील गंखेरा ते पुरगाव असा ६ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण कामास मंजुरी मिळाली होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. कामाला सुरवात देखील करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने ६ किलोमीटरचा रस्त्याचे हे काम वर्ष उलटल्यानंतर देखील पूर्ण केले नाही. यामुळे तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहागडाले व गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज राहागडाले यांनी त्याच रस्त्यावर बसून ठेकेदाराविरुद्ध आंदोलन केले. इतकेच नाही तर यास जबाबदार अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर बसविले. 

गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील आमदार विजय रहागडाले यांनी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गंखेरा ते पुरगाव असा ६ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण कामास मंजुरी मिळाली होती. दरम्यान मागील वर्षी म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. कंत्राटदाराणे काही ठिकाणी कामाची सुरवात सुद्धा केली. मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार विजय रहागडाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज यांच्याकडे केली. 

अधिकाऱ्यांकडून घेतले लेखी आश्वासन 

यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार राहागडाले हे स्वतः आज रस्त्यावर बसून आंदोलन केले. तर आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षानी लोकांच्या समोर खाली बसविले. तर येत्या ३० ओक्टोम्बरपर्यत रस्ता पूर्ण करून देऊ; असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान उद्यापासून काम सुरु न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावाकऱ्यांनी आणि आमदारानी अधिकाऱ्यांना दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT