Rain
Rain Saam tv
महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

अभिजीत घोरमारे

गोंदिया : हवामान विभागाने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान जिल्ह्यात आज गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाट अन्‌ वादळी वाऱ्यासह (Rain) पावसाला सुरुवात झाली. (gondia news come of pre monsoon rains in Gondia district)

यंदा दहा दिवस अगोदर मान्‍सूनचे आगमन वर्तविला आहे. यात मागील काही दिवसांपासून राज्‍यातील अनेक भागात मान्‍सूनपुर्व पावसाचे आगमन झाले आहे. त्‍यानुसार आज गोंदिया (Gondia News) जिल्‍ह्यात देखील मान्‍सुनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने तूफान हजेरी लावली त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे.

उकाड्यापासून दिलासा

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जिल्हावासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे।खरीप हंगामपूर्व कामासाठी देखील हा पाऊस अनुकुल मानला जात आहे. हवामान विभागाने 5 जूनपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) शंभर मि.मी. पाऊस झाल्याशिवाय खरीप हंगामातील पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मान्सूनपूर्व पावसाचा काही प्रमाणात रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रांना सुध्दा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT