Dhule News
Dhule NewsSaam tv

अग्निशस्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्‍या ताब्‍यात

अग्निशस्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्‍या ताब्‍यात

धुळे : दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहु लागले असतानाच नरडाणा पोलिसांनी चार अग्निशस्त्र व पाच जिवंत कर्तुसासह एका जणाला ताब्यात घेतले आहे. हरियाणा येथील गुन्हेगाराच्या अग्निशस्त्रसह नरडाणा पोलिसांनी (Police) मुसक्या आवळल्या आहेत. (dhule news criminals who came to sell firearms were caught by the police)

Dhule News
सुसाईड नोटमधून आई– वडीलांचे आभार मानत तरुणाची आत्‍महत्‍या

नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या (Dhule News) दभाशी गावाजवळ अज्ञात इसम हे अग्निशस्त्र सोबत बाळगून असून ते हे अग्निशस्त्र विक्रीच्या उद्देशाने आले असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नरडाणा पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी दोन इसम संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आले. या दोन्ही इसमांची पोलिस चौकशी करीत असता एक संशयित ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. तर अग्निशस्त्र बाळगून असलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याकडून जवळपास चार अग्निशस्त्र तसेच पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यासंदर्भात ताब्यात घेतलेल्या संशयिताची पोलीस प्रशासनातर्फे कसून चौकशी सुरू असून हे अग्निशस्त्र कुनाच्या संगण्यावरून विक्रीसाठी आणले होते याचा तपास करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com