Gondia Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : गोंदियाच्या मुख्य जलाशयात १९ टक्के जलसाठा; पाणी टंचाईचे संकट उभे

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणी पातळी कमी असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना पाणी मिळत नाही

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : यंदा राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात तलावांचा जिल्हा म्हणुन ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या कडक उन्हामुळे प्रमुख जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील मुख्य जलाशयात १९ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने मान्सून लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. 

गोंदिया जिल्ह्यात ४२ अंशांवर पारा पोहचला आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणी पातळी कमी असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना पाणी मिळत नाही. यात यंदा आणखी मान्सून लांबला तर भीषण पाणी समस्या गोंदिया जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे. 

गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण ४ मोठी जलाशय आहेत. त्यापैकी पुजारीटोला धरणामध्ये सध्याच्या घडीला ४२.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर शिरपूर जलाशयात ९.१९ टक्के जलसाठा असून कालीसराळ या जलाशयात फक्त पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. इटियाडोह या महत्वपूर्ण प्रकल्पामध्ये २६.३० टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. एकूण सात मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात असून या सातही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ३० टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT