Gondia Leopard Attack News Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Gondia Leopard Attack News : गोंदियात बिबट्याने ४ वर्षीय चिमुकल्याला घराच्या मागील अंगणातून उचलून नेऊन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

  • गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय हियांशचा मृत्यू

  • बिबट्याने चुलीजवळ बसलेल्या चिमुकल्यावर अचानक हल्ला केला आणि त्याला उचलून नेले

  • काही वेळानंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला

  • पालक आणि ग्रामस्थांत संताप व भीती

शुभम देशमुख,गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेले, या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजताच्या सुमारास हियांश हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र बिबट्याला पकडण्यापूर्वी तो हियांशला घेऊन पसार झाला. पालकांनी शोधाशोध केली असता काही वेळाने चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खडकी व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आज एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी काय म्हणाले?

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT