Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News: बाप-लेकांनी केली युवकाची हत्या; शेतात गुरे चारण्यास नेल्‍याचा होता जुना वाद

बाप-लेकांनी केली युवकाची हत्या; शेतात गुरे चारण्यास नेल्‍याचा होता जुना वाद

साम टिव्ही ब्युरो

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील (Gondia) भुराटोला येथील एका २८ वर्षीय युवकाची शेतात जनावरे चारण्यास नेल्याच्या जुन्या वादावरून बापलेकांनी मिळून युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी (Police) दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. (Live Marathi News)

भुराटोला (गोंदिया) येथे घडलेल्‍या घटनेतील मृतक गुरुदास माणिकचंद रहांगडाले याचे गावातीलच चंद्रकुमार तुमळे यांचे शेतात मागील वर्षी जनावरे चारण्यास गेल्याने झालेल्‍या नुकसानीवरून वाद सुरू होता. ज्यावरून गुरूवारी रात्री सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता तीन बाप लेकांनी मिळून या युवकास पकडून त्याच्‍यावर (Crime News) चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.

दोन जण ताब्‍यात

गुरुदास याला नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचारासाठी नेले होते. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठवले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

SCROLL FOR NEXT