Gondia Accident  Saam tv
महाराष्ट्र

Gondia Accident : भरधाव ट्रॅक्टर घरात घुसला; महिलेचा जागीच मृत्यू, दोन मुली थोडक्यात बचावल्या

Gondia News : रस्त्यावरून ये जा करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चारचाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातील एखाद्याच्या जीव जाऊ शकतो

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: मृत्यू कसा आणि कोठे होईल सांगणे अवघड आहे. अशाच एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. सकाळी घरात कपडे धुवत असताना रस्त्याने जाणारे एक भरधाव ट्रॅक्टर घरात घुसले व कपडे धुवत असलेल्या महिलेच्या अंगावर गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घरात असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या आहेत. 

रस्त्यावरून ये जा करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चारचाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातील एखाद्याच्या जीव जाऊ शकतो. अशीच घटना आमगावनगर (Gondia) परिषद भागातील किडांगीपार परिसरात घडली. किसना बुधराम चोरवाडे (वय ५८) ही आपल्या घरासमोर कपडे धुवत होत्या. याचवेळी अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि किसनाबाई यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर गेलं.  

ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसणाबाई यांचा जागेवरच करून अंत झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या.  (Accident) या घटनेत त्या थोडक्यात बचावल्या आहेत. अन्यथा ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता. मात्र या ट्रॅक्टर चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे किसनाबाई यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातातील ट्रॅक्टर आरटीओ द्वारा पासिंग केला नसून तसेच ट्रॉली अद्यापही विना नंबर असून आणि ती सुद्धा आरटीओद्वारा पासिंग केल्याचे दिसून आले नाही. याबाबत आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deleted Messages : महत्वाचा मेसेज डिलीट झाल्यास १ सेंकदात करा रिकव्हर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT