Gondia 3 Teachers Drown Saam TV
महाराष्ट्र

Gondia 3 Teachers Drown : धरणात बुडून ३ शिक्षकांचा मृत्यू; गोंदियातील हृदयद्रावक घटना

Gondia News : छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माणगावात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

Gondia News : गोंदियामधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. फिरायला गेलेल्या तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या माणगावात ही घटना घडली आहे.

धरणात (Dam)  बुडून मृत्यू झालेले तिघेही शिक्षक असून गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये ते शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये ते शिक्षक होते. काल रात्री फिरायला गेले त्यावेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. एन. मिश्रा (भिलाई), अरविंद (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

शोधकार्यादरम्यान रात्री एक तर आज सकाळी अन्य 2 मृतदेह सापडले असून तिन्ही मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT