Pune News : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून मुलीसह वडिलांचा मृत्यू

Bhor Taluka News : भोर तालुक्यातील भाटघर धरण बॅक वॉटरला असलेल्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे ही दुर्दैवी घटना घडली.
Bhor Taluka News, girl and her father drowned in Bhatghar Dam
Bhor Taluka News, girl and her father drowned in Bhatghar Dam SAAM TV
Published On

सचिन जाधव

Bhatghar Dam at Bhor in Pune : पुण्यातील भोर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. भाटघर धरण बॅक वॉटरजवळील वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

भोर तालुक्यातील भाटघर धरण बॅक वॉटरला असलेल्या वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. मुलगी आपल्या वडिलांसह पर्यटनाला येथे आल्या होत्या. पाण्यात पोहायला उतरलेल्या मुलीसह वडिलांचाही मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह सापडला होता. मात्र, वडील बेपत्ता होते. त्यांचाही मृतदेह आज सकाळी सापडला. दोघांचे मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले. (Latest Marathi News)

Bhor Taluka News, girl and her father drowned in Bhatghar Dam
Husband Killed Wife and Mother in Law : दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरलं! पतीने पत्नी आणि सासूला क्रूरपणे संपवले

ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३ ) आणि तिचे आईवडील, इतर दोन मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे सुट्टी असल्याने जयतपाड (ता. भोर) येथे फार्म पर्यटनासाठी (Tourism) गेले होते.

हे सर्व जण काल, मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फार्मच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाटघर धरणाचे (Bhatghar Dam) बॅकवॉटर पाहण्यासाठी आणि तेथे असलेला धबधबा व बेबी पूल पाहण्यासाठी धरणाच्या कडेला गेले. शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) (रा. औंध पुणे) हे धरण्याच्या पाण्यात उतरले. त्यानंतर शिरीष यांनी ऐश्वर्याला खोल पाण्यात जवळ बोलावून घेतले. ऐश्वर्या आणि शिरीष मनोहर धर्माधिकारी हे दोघे पाच ते सहा मिनिटे खोल पाण्यात पोहत होते.

Bhor Taluka News, girl and her father drowned in Bhatghar Dam
Pune Crime News : 307 चा बदला 302 ने; पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं

काही वेळाने ते दोघे पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका तरुणाने ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले. ती बेशुद्धावस्थेत होती. तिला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

वर्धा नदीत पोहायला गेलेल्या २ तरुणांचा मृत्यू

यवतमाळच्या वणी तालुक्यातील नायगाव येथील सहा तरूण वर्धा नदीवर पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दोघे वाहून गेल्याची घटना काल दुपारी घडली होती. कोना शिवारात एकाचा; तर दुसऱ्याचा माजरी शिवारात मृतदेह आढळला. प्रवीण सोमलकर आणि दिलीप कोसुरकर अशी मृत तरुणांची नावे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com