Ladki Bahin Yojana yandex
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सुवर्णसंधी! योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार?

Ladki Bahin Yojana Application Process: काही महिलांनी उशिरा अर्ज केले किंवा अजून अर्जच भरलेला नाही. आता त्या महिलांसाठी दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे.

Dhanshri Shintre

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूप गाजली आहे. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात ६ हफ्ते जमा झाले असून, त्यांना एकूण ६००० रुपये मिळाले आहेत. मात्र, काही महिलांनी उशिरा अर्ज केले किंवा अजून अर्जच भरलेला नाही. आता त्या महिलांसाठी दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. कधीपासून प्रक्रिया सुरू होईल, याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होईल. महिलांनी अर्जासाठी तयार रहावे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात या योजनेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. महिलांना यापुढे दर महिन्याला २१०० रुपये देण्यात येणार आहेत. ही घोषणा झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरूवात होऊ शकते.

मात्र, या प्रक्रियेसाठी महिलांना काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाला असून, अनेक जणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नव्या लाभांसाठी पात्र महिलांनी तयारीत राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना आता त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे. याआधी राज्यातील सुमारे १२ लाख महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसतानाही त्यांना या योजनेचे पैसे मिळाले होते. मात्र, ज्या महिलांनी उशिराने का होईना, आधार लिंक केले आहे, त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण ९००० रुपये जमा झाले आहेत.

अद्याप अर्ज न भरलेल्या महिलांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. महिलांनी आधार लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT