Health Department Recruitment 2023
Health Department Recruitment 2023 SAAM TV
महाराष्ट्र

Health Department Recruitment 2023 : सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, आरोग्य विभागात 4751 पदांसाठी बंपर भरती

Priya More

Job News: नोकरीच्या शोधामध्ये (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागामध्ये (Health Department) त्यांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. आरोग्य विभामध्ये 4751 पदांसाठी बंपर भरती (Health Department Recruitment 2023) होणार आहे. या भरतीसंदर्भात आरोग्य विभागातर्फे अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी वेळ न घालवता तात्काळ अर्ज करावा.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. तब्बल 4751 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या पदांपैकी 4000 पदं ही परिचारीकांसाठी असणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत येत्या 25 मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट- क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सातव्या वेतन आयोगानुसार त्या-त्या पदांसाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी आणि नियमानुसार लागू असणारे भत्ते दिले जाणार आहेत. रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत, असं देखील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांसाठी इतक्या जागा -

- अधिपरिचारिका - 3,974 पदे (खुल्या वर्गासाठी 1954 पदे, अनुसूचित जमातीसाठी 321 आणि अनुसूचित जातीसाठी 338 पदे)

- प्रयोगशाळा सहाय्यक - 170 पदे

- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 112 पदे

- ग्रंथपाल - 12 पदे

- स्वच्छता निरीक्षक - 9 पदे

- ईसीजी तंत्रज्ज्ञ - 36 पदे

- आहारतज्ज्ञ - 18 पदे

- औषधनिर्माता - 169 पदे

- कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार - 19 पदे

- समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) - 86 पदे

- ग्रंथालय सहाय्यक - 16 पदे

- व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट - 7 पदे

- दूरध्वनी चालक - 17 पदे

- महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख - 5 पदे

- अंधारखोली सहाय्यक - 10 पदे

- किरण सहाय्यक - 23 पदे

- सांख्यिकी सहाय्यक - 3 पदे

- शिंपी 15 पदे

- वाहन चालक 34 पदे

- गृहपाल - 16 पदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT