Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसात ३००० रुपयांची वाढ

Gold Rate Today Hike On Navratri 3rd Day: आज नवरात्रीच्या सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. मागील दोन दिवसात सोन्याचे दर ३००० रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

नवरात्रीत सोन्याचे दर वधारले

दोन दिवसांत सोन्याचे दर ३००० रुपयांनी वाढले

सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याचे दर जवळपास ३००० रुपयांनी वाढले आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमधील सराफा बाजारपेठेत सोन्याने उच्चांक गाठला आहे.

आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४,४०० रुपये आहेत. तर जीएसटीसह १,१७,८३२ रुपये आहेत. चांदीचे दर १,३६,००० रुपये आहेत. जीएसटीसह चांदी १,४०,०८० रुपयांवर विकली जात आहे.

नवरात्रीत सोन्याचे दर वाढले

जळगाव नवरात्रीच्या पहिल्या दोनच दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन १ लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली. दोन दिवसांत सोने दोन हजार ९५० रुपयांनी, तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.

सोन्याचे दर १ लाख १५ लाख रुपयांवर पोहचले (Gold Rate Hike)

सोमवारी सोन्याच्या भावात एक हजार ९५० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १३ हजार ४०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे, मंगळवारी चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात सोन्याचे दर २ हजारांनी वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

Maharashtra Live News Update : दिवाळीच्या गर्दीत हरवला चिमुकला, पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत शोधला

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?

Kartiki Ekadashi : विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; कार्तिकी एकादशीची तयारी, विठ्ठलाचे राजोपचार झाले बंद

SCROLL FOR NEXT