Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: गेल्या आठवड्याच सोनं 12500 रुपयांनी स्वस्त, आज काय झालं? वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold-Silver Price Today At Jalgaon Sarafa Market: आज जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं २००० रुपयांनी वाढले तर चांदीचे दर १००० रुपयांनी वाढले.

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आठवडाभरात सोनं १२५०० रुपयांनी स्वस्त झालं. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोनं २५०० रुपयांनी वाढले तर १ किलो चांदी १००० रुपयांनी वाढली. सोनं-चांदीचे दर पुन्हा वाढू लागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोनं-चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं १,२५,८०० रुपयांनी विकले जात आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २५००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं १२,५८,००० रुपयांनी विकले जात आहे. तर आज १ किलो चांदीचे दर १००० रुपयांनी वाढले आहे. चांदी १,५५,००० रुपयांनी विकले जात आहे. आज सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,४८० रुपयांनी वाढले. हे सोनं १,२६,५६० रुपयांना विकले जात आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १३५० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं १,१६,००० रुपयांना विकले जात आहे. तर १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं ९४,९१० रुपयांना विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

Maharashtra : महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिवपदासाठी हालचालींना वेग; 'ही' ३ नावे चर्चेत

Winter Foot Care : हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे फक्त कोरडेपणा नाही, 'ही' ८ कारणेही असू शकतात

China Moon Mission: चंद्रावर कब्जा मिळवण्यासाठी चीनचा मास्टरप्लॅन, 2050 पर्यंत सुरू करणार खाणकाम; नेमकं काय घडणार?

Kitchen Hacks : कांदा-लसणाचा उग्र वास चॉपिंग बोर्डवर चिकटलाय? मिनिटांत गायब करतील 'हे' ५ भन्नाट जुगाड

SCROLL FOR NEXT