Gold Price Drop Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold Price Drop: जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला आहे. १० तोळा सोन्याच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली.

Priya More
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

  • सोने खरेदीसाठी आजची सुवर्णसंधी

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ५००० रुपयांनी स्वस्त

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजाराच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोनं ५०० रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली. सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहाकांना १ लाख ४३ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी १४ लाख ३० हजार रुपये खर्च करावे लागतील.

तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी २ लाख २१ हजार रुपये खर्च करावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८२० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी १,४४,३३० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७५० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,३०० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये ६२० रुपयांची वाढ झाली असून खरेदीसाठी १,०८,२५० रुपये खर्च करावे लागती. तर आज चांदीच्या दरात देखील कोणताही बदल झाला नाही. १ किलो चांदी खरेदीसाठी २,३५,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

Tragedy : ९५ टक्के मिळूनही मनासारख्या कॉलेजला प्रवेश नाही; विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली, ठाण्यातील हायप्रोफाइल परिसरात घटना

Pune Crime: पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात चौघांकडून चाकूने सपासप वार

Medu Vada Recipe : ना डाळ भिजवायची, ना पीठ आंबवायचं! 'या' पदार्थापासून झटपट बनवा कुरकुरीत मेदू वडा

Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान लँड न होता पुन्हा हवेत झेपावलं; लखनौ एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT