Gold Price Fall Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

Gold-Silver Price Drop: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • १० तोळे सोन्याच्या दरात सुमारे १५,००० रुपयांची घसरण

  • १ किलो चांदीच्या दरात सुमारे १०,००० रुपयांची घसरण

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावचा सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. १० तोळा सोनं १५००० रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदी तब्बल १० हजार रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोनं- चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह १ लाख ५८ हजार १०५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह १५ लाख ८१ हजार ०५० रुपये खर्च करावे लागतील.

तर आज चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदी १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. १ किलो चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ६६ हजार ७७० रुपयांवर आले आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करणं फायदेशीर राहिल. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे सुवर्णनगरीत सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. ग्राहकांमध्ये आज आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,५५,७३० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,४२,७५० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी १,१६,८०० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिटात चांदीचे नाणे ठेवल्याने खरोखरच पैसा टिकतो का?

Maharashtra News Live Update: डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द

अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वतःच्या जमिनी घेतल्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Chanakya Niti : लग्नासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कसा असावा? आचार्य चाणक्यांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स

गावरान स्टाईल शेपूची भाजी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT