Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सुवर्णनगरीत दसऱ्याला सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; वाचा आजचे दर किती?

Jalgaon Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख १७ हजार रुपये आहेत.दरम्यान, आज दसऱ्याच्या दिवशी अनेकांनी सोने खरेदी करण्याला पसंती दिली आहे.

Siddhi Hande

आज सोन्याचे दर वाढले

दसऱ्याला सोने खरेदीसाठी लगबग

जळगावमध्ये सोन्याचे दर किती?

आज दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. आजच्या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान,जळगावला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीची लगबग दिसून आली. परंपरेनुसार, सोने घेणे मंगल मानले जाते. त्यामुळे सकाळपासूनच सराफा दुकाने गजबजली होती. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

सध्या २२ कॅरेट सोने प्रतिदहा ग्रॅम एक लाख सात हजार ४५०, तर २४ कॅरेट सोने एक लाख १७ हजार ३०० आहे.GST सह हे दर १ लाख २१ हजार ५०० रुपये आहेत. या वाढलेल्या भावांमुळे अनेकांनी मोठ्या खरेदीऐवजी हलके दागिने, अंगठ्या व नाण्यांना पसंती दिली.

सोने ग्राहकांची पहिली पसंती ठरले .सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.२३ सप्टेंबरला सोने एक लाख १४ हजार ५०० रुपये प्रतिदहा ग्रॅम होते. शनिवारी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घट होऊन सोने एक लाख १४ हजार २०० वर पोहोचले. २३ सप्टेंबरला चांदी एक लाख ३६ हजार रुपये प्रतिकिलो होती. शनिवारी त्यात आठ हजारांची वाढ होऊन चांदी एक लाख ४४ हजारांवर पोहोचली होती.

मागच्या वर्षी दसऱ्या सोन्याचे भाव किती?

मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोन्याच्या दरात भरघोस वाढ झाली आहे. मागच्या वर्षी सोन्याचे दर ७६ हजार रुपये आहे. आज हे दर जवळपास १ लाख २१ हजार रुपये झाले आहेत. दरम्यान, चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १ किलो चांदीची किंमत ९३००० रुपये आहे, यावर्षी हे दर १ लाख ५१ हजार रुपये आहे. या दरात खूप जास्त वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर, तर पुणेकर राज्यात अव्वल, धक्कादायक आकडेवारी

Shocking: धक्कादायक! ३० जणांनी घरात घुसून गोळीबार केला, पोलिसांनी तिघांना अटक केली

Maharashtra Dasara Melava Live Update : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना

Heart attack: 99% टक्के लोकांना 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

Buldhana : समृद्धी महामार्गावर अवैध गुटख्याची तस्करी; एक कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT