Todays Horocope: 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीतून फायदा मिळेल, वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज श्रीकृष्ण जयंती आहे. असाही आपला दिवस धामधुमीत जाणार आहे. दिवस चांगला जाईल.

वृषभ

मनासारख्या गोष्टी घडतील म्हणून हातावर हात धरून बसणे योग्य नाही. तर मनासारखे करण्यासाठी विशेष धडपड आज करावी लागेल.

मिथुन

मित्र-मैत्रिणींच्या टोळक्यामध्ये मस्त,गुंग राहाल. वेगळे काहीतरी नव्याने करण्याची उर्मी आज जागृत होईल.

कर्क

समाजकारणामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. एखाद्या राजकारणी व्यक्तीबरोबर संबंध दृढ होतील.

सिंह

एकमेकांवर प्रेम करण्यात मशगुल राहाल.आनंदाच्या वार्ता कानी येतील. भाग्यकारक घटना घडतील.दिवस चांगला आहे. श्रीकृष्ण उपासना आज करावी.

कन्या

जोडीदाराच्या कुटुंबीयांच्याकडून विशेष धनयोग आहेत. अचानक पैसा मिळेल. कुठल्यातरी गोष्टीने प्रेरित होऊन उठाल. धावपळीमध्ये व्यस्त रहाल.

तूळ

प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य,स्नेहबंध, ममत्व हे सर्व सहजगत्या आपल्याच व्यक्तीकडून आज मिळणार आहे. त्यामुळे दिवस उत्तम राहील.

वृश्चिक

जुनी दुखणे, आजार डोके वर काढतील.आपले कोण परके कोण हे ओळखून पुढे चला, पुढे वाटचाल करा.महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.

धनु

उपासनेसाठी दिवस उत्तम आहे.श्रीकृष्ण उपासना आज जयंती निमित्त करावी. त्याचे द्विगुणीत फळ तुमच्या पदरात आज येणार आहे.

मकर

जुन्या काही गोष्टी मग गाडी असेल, जागा असेल घर असेल याच्याशी निगडित आज काही व्यवहार होतील. नव्याने गोष्टी काही करायचं असतील तर आज कल्पना सुचतील.

कुंभ

लेखन क्षेत्रामध्ये प्रगती होईल. जवळच्या प्रवासातून पत्रव्यवहारांमधून फायदा होईल. शेजारी संबंध दृढ होतील. भावंड सौख्य उत्तम आहे. काळजी नसावी.

मीन

पैशालाच पैसा जोडता येतो हे आज जाणवेल. गुंतवणुकी मधून फायदा आहे.