Today Gold Rate Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Gold Rate Today on Dhanteras: धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दिवाळीत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफ बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली आहे.

Siddhi Hande

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर घसरले

सोन्याच्या दरात ३००० रुपयांची घसरण

दिवाळीत ग्राहकांना मोठा दिलासा

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे दर तीन हजार रुपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर देखील किलोमागे 5000 रुपयांनी कमी झाले आहेत. धनत्रयोदशी निमित्त जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सोने चांदीचे दर काहीसे कमी झाले असले तरी येत्या काळात मात्र सोने आणि चांदीचे दर वाढत राहतील अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी एक लाख 28 हजार 300 रुपयांवर आले आहे तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 70 हजार रुपयांवर आले आहेत. यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे दर १ लाख ३० हजारांवर जातील. हे दर आज जरी कमी झाले असले तरीही ते वाढण्याची शक्यता आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांगला मूहूर्त आहे. या मूहूर्तावर अनेकजण खरेदी करतात. सोन्याचे दर जवळपास १ लाख ३० हजार रुपये झाला आहे. तरीही ग्राहकांनी आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.

धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळेच ग्राहक आज मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवसदेखील सोने खरेदीमध्ये वाढ होत राहिल, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कांदा कापल्यानंतर हातांना वास येतो? मग वापरा या ५ टिप्स

माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकून मारणाऱ्या वकिलावर हल्ला; भरकोर्टात वकिलांनी चप्पलांनी चोपला, VIDEO

Lakshmi Niwas: भावना सिद्धूला जेलमधून सोडवू शकेल का? लक्ष्मी निवास मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

Leopard Attack : आधी पायाला चावा नंतर मानेवर हल्ला, महिला घराबाहेर पडताच बिबट्याने संधी साधली

Smriti Mandhana: लग्न मोडलं, हृदय तुटलं पण खचली नाही, स्मृतीने केली नव्याने सुरुवात, भावाने शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT