Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा सोनं १२००० रुपयांनी वाढलं; २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Jalgaon Sarafa Market: जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोनं १२०० रुपयांनी महागले तर चांदीच्या दरातही २००० रुपयांची वाढ झाली.

Priya More
  • जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

  • १ तोळा सोनं १२०० रुपयांनी महागले

  • चांदीच्या दरातही २००० रुपयांची वाढ झाली

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर पोहोचला

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढउतार सुरूच आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये देखील सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ- उतार पाहायला मिळत आहे. आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२०० रुपयांची तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांची वाढ झाली आहे.

बुधवारी जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये १२०० रुपयांची वाढ झाली होती. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ४००० रुपयांची घसरण झाली होती. आज पुन्हा १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२०० रूपयांची वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्‍या दरामध्ये २००० रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सोनं- चांदीच्‍या दरात स्‍थिरता नसल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

मंगळवारी सोनं आणि चांदीच्‍या दराच्‍या तुलनेत बुधवारी सुवर्ण बाजार खुला होताच दर कमी झाले होते. सोन्‍याच्‍या दरात प्रतिदहा ग्रॅम विनाजीएसटी एक १२०० रुपयांची घसरण होऊन दर १ लाख ५६ हजार ३०० रुपयांवर खाली आले होते. आज पुन्‍हा १२०० रूपयांची वाढ होऊन १ किलो सोन्याचे दर १ लाख ५७ हजार ५०० रूपयांवर पोहचले. तर चांदीत बुधवारी ४००० रुपयांची घसरण होऊन चांदी २ लाख ६८ हजारांपर्यंत खाली आली असताना आज २००० रूपयांची वाढ होऊन चांदीचे दर २ लाख ७० हजार रूपयांवर पोहचली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात सोनं आणि चांदीच्‍या दरात मोठी वाढ होऊन दर उच्‍चांक गाठत आहे. तर कधी दरात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन सर्वसामान्‍यांना दिलासा मिळत असतो. सोनं-चांदीच्या दरातील चढ - उतार सातत्‍याने सुरू असल्‍याने खरेदीदारांमध्‍ये देखील संभ्रम असतो. दरम्‍यान सध्‍या अधिक मास सुरू असल्‍याने प्रामुख्‍याने चांदी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post viral fatigue: ताप गेल्यानंतरही अशक्तपणा जात नाहीये? या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Plane Crash : हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू, देशावर शोककळा

Reel Star Prem Bhatia Accident: सुप्रसिद्ध रीलस्टारच्या दुचाकीचा अपघात, प्रेम भाटीचा उपचारादरम्यान मृत्यू

Matheran Trip Budget : मुंबई-पुण्याजवळचा स्वर्ग! माथेरान ट्रिपचा खर्च किती येतो? जाणून घ्या

RBI ची मोठी कारवाई! राज्यातल्या 'या' सहकारी बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी

SCROLL FOR NEXT